बिग बॉस

Arya Jadhao Big Boss Marathi 5: बिग बॉसमधून बाहेर येऊन रॅपर आर्याने केला तिच्या स्टाइलने निक्कीवर हल्लाबोल म्हणाली...

Published by : Team Lokshahi

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून आर्या चर्चेत येताना दिसत आहे. निक्कीच्या कानाखाली मारल्या प्रकरणी आर्याला घरातून बेदखल करण्यात आलं त्यादरम्यान प्रेक्षकांकडून बिग बॉस आणि रितेश देशमुख यांच्यावर अनेक टीका केल्या गेल्या. तसेच बिग बॉस स्क्रिप्टेड तर नाही ना?असा प्रश्न प्रेक्षकांकडून केला जात आहे. तर आर्या अमरावतीमध्ये दाखल झाल्यापासून तिच्यावर कौतूकांचा वर्षाव झाला आहे. अमरावतीत तिचं स्वागत ही मोठ्या संख्येने करण्यात आलं होत. प्रेक्षकांकडून आर्याला प्रतिक्रिया येत आहेत की, जे बिग बॉसने करायला हवं होत ते आर्याने केलं. आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं पण तिला चाहत्यांच्या मनातून कस काढणार असा देखील प्रश्न चाहत्यांकडून आणि बिग बॉस प्रेक्षकांकडून केला जात आहे.

तर बिग बॉसच्या घरात असताना पण आर्या आणि निक्कीमध्ये अनेक वेळा वादाची ठिणगी उडाली आहे. काही वेळा ही वादाची ठिणगी मोठ्या भांडणांच देखील रुप घेऊन झालेलं आहे. तर आर्या अनेक खेळांमध्ये निक्की आणि जान्हवीला एकटी भारी पडताना देखील पाहायला मिळालं आहे. मात्र आता आर्याने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर निक्कीची पुन्हा शाळा घेतली आहे. आर्याने तिच्या स्टाइलमध्ये निक्कीला सडेतोड उत्तर दिले आहे. आर्याला रॅपर आर्या म्हणून ओळखल जाते आणि तिने बिग बॉसच्या घरात ही तिचा स्वत:चा एक रॅप सादर करून दाखवला होता. आता देखील आर्याने शायरीच्या माध्यमातून निक्कीला चांगलचं सुनावल आहे.

आर्या इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन शायरी सादर केली होती. ज्यात निक्की तिच्यासोबत जे जे वागली आहे त्या सगळ्याचा हिशोब केला आहे. निक्की घर तोडण्यात व्यस्त होती तर आर्या चाहत्यांचे मन जिंकून विजयी झाली असं देखील आर्या स्वतःच्या कवितेत म्हणाली आहे. तर आर्या हे सादरीकरण करत असताना चाहत्यांकडून तिला खूप चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तर चाहत्यांकडून अशी मागणी केली जात आहे की, आर्याला पुन्हा बिग बॉसच्या घरात घेतलं पाहिजे अशी मागणी आर्याच्या चाहत्यांकडून आणि प्रक्षकांकडून केली जात आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; मोहित कंबोज यांचं ट्विट, म्हणाले...

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना